कॉफी हा पेय सगळ्यांना आवडते. कॉफी पिलं की ताजेतवाने वाटते. आता पर्यंत कॉफीचे आरोग्याविषयी फायदे जाणून घेतला असाल पण तुम्हाला माहिती आहे का..? तुम्ही जी कॉफी पिता त्याचे फक्त आरोग्यालाच नाही तर केसांना सुद्धा फायदे आहेत. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे तुमच्या केसांसाठी आयोग्यदायी असतात.
चला जाणून घेऊया कॉफीचे फायदे..!
- कॉफी तुमचे केस मऊ आणि चमकदार करते
कॉफी केवळ तुमचे केस मजबूत करत नाही तर केस मऊ आणि चमकदार बनवते. कॉफीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे सुस्ती आणि कोरडेपणाशी लढतात.
- टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते
जेव्हा कॉफी टाळूवर लावली जाते, तेव्हा ते रक्त परिसंचरण सुधारते. हे पोषक तत्वांना केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. यामुळे तुमचे केस जलद वाढतात आणि दाट होतात.
- टाळूचे डिटॉक्सिफिकेशन
कॉफी वापरल्याने टाळूचे डिटॉक्सिफाईंग होण्यास मदत होते. जेणेकरून त्वचेच्या पीएच पातळीमध्ये समतोल होतो. ज्यामुळे केस गळतीची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.
असे वापर करा कॉफीचा..!
- कॉफी आणि कोरफड जेल
एका भांड्यात १ चमचे कॉफी पावडर घ्या. त्यात २ चमचे कोरफड जेल मिक्स करा. दोन्ही गोष्टी मिक्स करा आणि डोक्याला मसाज करा. अर्धा तास तसेच राहू द्यात आणि केस सौम्य शाम्पूने धुवा. ही पेस्ट तुमचे केस नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी काम करेल. तुम्ही ते आठवड्यातून एकदाही वापरू शकता.
- दही आणि कॉफी पॅक
एका भांड्यात २ चमचे दही घ्या. त्यात कॉफी पावडर घाला. या दोन गोष्टी एकत्र करून डोक्याला लावा. दही आणि कॉफीचा मास्क केसांवर अर्धा तास लावा. यानंतर, सौम्य शैम्पू वापरून केस धुवा.
- कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल पेस्ट
एका भांड्यात १ चमचे कॉफी पावडर घ्या. त्यात २ चमचे कोल्ड प्रेस केलेले ऑलिव्ह ऑईल मिसळा. याने टाळू आणि केसांना मसाज करा. काही मिनिटे केसांवर ठेवा. अर्ध्या तासाने सोडल्यानंतर केस धुवा. हा पॅक तुमचे केस मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी काम करतो.
4.कॉफी आणि मधाचा वापर
मधामुळे देखील केसांना चांगले पोषण मिळते. हा उपाय करण्यासाठी कॉफी आणि मध एकत्र करून हे मिश्रण केसांनी आणि टाळूला लावा. हे मिश्रण अर्धा तास तरी तसेच राहू द्या. त्यानंतर हा मस्क स्वच्छ धुवून टाका.
हा पॅक तुम्ही आठवड्यातून एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात 2 चमचे मध घाला. या दोन्ही पदार्थांची पेस्ट बनवून केस आणि टाळूला लावा. हे मिश्रण अर्धा तास तरी केसांवर राहू द्यावे. नंतर केस स्वच्छ धुवावेत. या उपायाने केसांचा पोत सुधारण्यास मदत होतो.