मुंबई – बॉलिवूड मध्ये सगळयात पॉप्युलर जोडी मध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर खान या जोडीचा समावेश आहे. दोघांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी सैफिना म्हणून नाव दिले आहे. दोघांचे लाखो चाहते आहेत, जे त्यांच्या जोडीवर खूप प्रेम करते. दोघ एकमेकांना २००८ मध्ये आलेला तशन चित्रपटांपासून डेट करायला लागले. दोघे लिविंग रिलेशनशिप मध्ये सुद्धा एकत्र राहिलीत. २०१२ ला दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं. दोघे नेहमी कोणत्याना ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता सुद्धा ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. ती चर्चा म्हणजे दुसरी तिसरी कोणतेही नसून त्यांच्या घटस्फोटाची. लग्नाच्या 13 वर्षांनंतर करीना आणि सैफ यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामागे देखील मोठं कारण आहे. सोशल मीडियावर सैफ याचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकताच सैफ याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सैफ याच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधलं.

सैफ याच्या हातावर पत्नी करीना हिच्या नावाचा टॅटू होता. पण आता अभिनेत्याच्या हातावर दुसराच टॅटू दिसत आहे. अभिनेत्याच्या टॅटूचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एका लग्नाच्या तयारीत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवाब सैफ तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोट होणार पक्क आहे…’, चौथा नेटकरी म्हणतात, ‘आता टॅटू बोलला आहे, काही दिवसांनी पत्नी बदलेल…’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘सैफ हॅट्रिक मारण्यासाठी तयार आहे…’ सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त सैफ – करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.