सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे.

ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र(६५० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते.

या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे

सह्याद्री त्यांच्या समृद्ध आणि अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांच्या एकत्रीकरणासाठी प्रसिद्ध आहेत. या रांगेला उत्तर महाराष्ट्रात सह्याद्री आणि केरळमध्ये सह्या पर्वतम् म्हणतात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांना पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.

एका ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमधून सह्याद्री आणि दख्खनचं पठार निर्माण झालं असं सांगितलं जातं

तज्ज्ञांच्या मते अंदाजे 15 कोटी वर्षांपूर्वी सह्याद्री पर्वतरांगास निर्माण झाल्या असाव्यात असं म्हटलं जातं

पृथ्वीवर झालेल्या ज्वालामुखीच्या उत्त्पतीतून याची निर्मिती झाली. या खडकाचं वैशिष्ट्ये म्हणजे हा गडद रंगाचा हा खडक अतिशय खडबडीत आणि कणखर असतो.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक देखील आढळतात.

सह्याद्री जितका राकट आणि दणकट आहे तेवढंच त्याचं सौंदर्य मनाला घाव घालते