मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता नागा चैत्यन्य आणि अभिनेत्री समंथा प्रभू या दोघांची जोडी दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतील सगळ्यात क्युट जोडी मानली जात होती. दोघे चार वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. दोघेही नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेता नागा चैत्यन्य आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या नागा चैत्यन्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच्यामुळे त्याला त्याचे चाहते सोशल मीडियावर चांगलेच ट्रॉल करत आहेत.

एकाच वेळी दोघींना केलंय डेट

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शैलजा रेड्डी अल्लुडू’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नाग चैतन्यने ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की त्याने कधी एकाच वेळी दोघींना डेट केलंय का? याच मुलाखतीत त्याची सहअभिनेत्री अनु इम्यॅनुअलसुद्धा उपस्थित होती. तिने त्यावर नकारार्थी उत्तर दिलं होतं. पण नाग चैतन्यने मात्र ‘होय’ असं म्हटलंय. “प्रत्येकाने आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. अशानेच तुमची प्रगती होते आणि तुम्ही ठरवू शकता की, ठीक आहे मी सर्व अनुभव घेतले आहेत आणि आता कुठेतरी स्थिरावण्याची वेळ आली आहे”, असं तो पुढे म्हणतो.

या सिनेमाच्या दरम्यान नागा चैत्यन्य आणि समंथा प्रभू यांचं लग्न झालं होत. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट जाहीर केला. घटस्फोटानंतर समंथावर नेटकऱ्यांकडून बरीच टीका झाली होती. तिने नाग चैतन्यला फसवल्याचा आरोपही काहींनी केला होता. पण आता या व्हिडिओमुळे चाहत्यांनी त्याला धारेवर धरले आहे. आता यावर नागा चैत्यन्य काय स्पष्टीकरण देतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.