काजवा म्हणजे निर्सगात असणारा छोटा किडा . काजव्यांच्या पाठीवर दिव्यांप्रमाणे लुकलुकणारा प्रकाश बघायला मिळतो.

दरवर्षीं भंडारदरा कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांचा प्रकाशोत्सव आयजीत केला जातो.

निसर्गाचा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी असंख्य निसर्गप्रेमी पर्यटक हजेरी लावतात

दरवर्षी वळवाच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजव्यांचा मिलनाचा देखील उत्सव सुरू होतो.

मादी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी झाडांवर बसलेले नर काजवे लुकलुकतात, चमकतात आणि या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळच घातली आहे.असे चित्र बघायला मिळते.

निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक व्यावसायिक पर्यटन संस्था काजवा महोत्सवांचे आयोजन करतात.

रात्री काजव्यांच्या पोटातून लुकलुकणाऱ्या प्रकाशात झाडांच्या फांद्या उजळतात. लयबद्ध पद्धतीने लुकलुकणारे काजवे या काळात दिसतात.

मिलनानंतर काही दिवसातच मादी पाणथळ जागेत अंडी घालते आणि पुढील पिढी जन्माला येते.