कागल ( प्रतिनिधी ) कागल तहसीलदार कार्यालयातील महसूल अव्वल कारकून अश्विनी कारंडे या एका प्रकरणात आपल्याकडे लाच मागत असल्याची तक्रार कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. यानुसार सापळा रचला असता आज कागल तहसीलदार कार्यालयातील महसूल अव्वल कारकून अश्विनी कारंडे यांना 30 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यावरुन वारंवार नागरीकांच्या तक्रारी देखील येत होत्या. मात्र कारवाई अभावी हा प्रकार वाढतच होता. मात्र आज दि 21 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास मिळालेल्या तक्रारीनुसार आज दुपारी 4 च्या दरम्यान कारंडे या थेट कार्यालयात लाच स्वीकारत होत्या.
यावेळी महसूल शाखेमध्ये बहुतांशी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कारंडे लाच घेताना पकडल्याचे समजताच कार्यालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांनी टेबल सोडून पळ काढला. मात्र या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, कागल पंचक्रोशीत आता एकच विषय चर्चेत आहे.