कसबा बावडा ( वार्ताहर ) बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.विज्ञान शाखेत नेहा राजेंद्र कानकेकर हिने याने 93.17 टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला असून भूविज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. अथर्व पटेल याने 9२.17 टक्के गुणासह द्वितीय तर श्रेयश कुलकर्णी याने 90.67 टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमात वैष्णवी रविंद्र केंबळकर हिने 95 टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला आहे. सानिका सोनटक्के हिने 93.50 टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून दोघानीही अकौंटन्सी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. प्रियल देशपांडे हिने 91.83 टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले. तर वाणिज्य शाखा मरठी माध्यममध्ये सायमा इनामदार हीने 65.50 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

त्याचबरोबर हर्षिता राजपुरोहित हिने अकौंटन्सी विषयात, प्रज्वल पाटील याने माहिती तंत्रज्ञान विषयात तर इंद्रायणी पाटील व सृष्टी घेवारी यांनी भूविज्ञानमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.