पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी लॉ कॉलेज रोड येथील बलवंत आश्रम जोग वाड्यातील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी, जोगवाडा म्हणजे एकेकाळी संघ परिवारातील जुन्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरणाचे हक्काचे ठिकाण होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यक्रम या वाड्यातील जुन्या मंदिरात होत असल्याने अनेक स्वयंसेवक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असायचे.

परंतु, बदलत्या काळानुसार आता या वाड्याची जागा प्रशस्त इमारतीने घेतली आहे. आज या भेटी प्रसंगी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे पाटील यांनी म्हटले.