साळवण (प्रतिनिधी) : कोदे बुद्रुकच्या अजित दळवी यांनी मुंबईहुन १९ सप्टेंबर रोजी सुरुवात करत ३६ जिल्हे आणि ४ हजार कि.मी.चे अंतर पूर्ण करुन आज (मंगळवार) गगनबावड्यात प्रवेश केला. यावेळी त्यांनी हा उपक्रम शहिद जवानांना श्रद्धांजली तसेच कोरोना योद्ध्यांना मानवंदना करण्यासाठी केल्याचे सांगितले.
अजित दळवी यांनी यापूर्वी मोठे सायकल ट्रेक केले असून पुणे येथील सायकल रेसिंगमध्येही त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी आज सकाळी अजित यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण करुन गगनबावडयात प्रवेश केला. यावेळी गगनबावडा तालुका कलामंचच्या वतीने अजित यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी गगनबावडा तालुका कलामंचचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र सराफदार, गिरीश प्रभुलकर, दिपक घाडगे, सोमप्रकाश माळी, सुनिल गवळी, हर्षद सुर्यवंशी, अजित शिंदे, सचिन डफडे, सुरेश वरेकर, विनायक पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.