मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून, या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे.

या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून, त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून ५० आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असताना किशोरी पेडणेकर यांना ही धमकी आली आहे. मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवले होते. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरे यांना सांग’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.