सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने थोडीफार उघडीप दिल्याने करवीर तालुक्यात खरीप हंगामातील भुईमूग पीकांच्या काढणीच्या कामांची धांदल वाढू लागली आहे.
खरीप हंगामातील पीकांच्या सुगीची चाहुल लागल्याने भुईमूग, सोयाबीन, रताळे, वरी यासारख्या पीकांची काढणी-मळणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शाळा, कॉलेज अजूनही बंद असल्यामुळे विद्यार्थीही शेतीच्या कामात दंग झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. खरीप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे यंदा भुईमुग पीकांच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.