टोप (प्रतिनीधी) : उत्तरप्रदेश येथील लखीमपूरमधे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले परीसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

हातकणंगले, आळते, कुंभोज, अतीग्रे, सावर्डे, मजले, नरंदे, नेज गावातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवला. यामधून अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली होती. नेहमीच गजबजलेला हातकणंगलेतील बाजारपेठेत शांतता पसरली होती. यावेळी   हातकणंगले येथे तहसीलदार कार्यालयापासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच या घटनेचा निषेधही करण्यात आला.

यावेळी माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, नगराध्यक्ष अरूण जानवेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, पं.स. सदस्य पिंटू मुरूमकर, अरुण माळी, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, संदीप शेटे, राजू पाटील, विजय भोसले, धोंडीराम कोरवी, दीपक वाडकर, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.