हातकणंगले (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री आयुष्यमान भारत व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यातून ९०० आजारांवरती १० लाख रुपये पर्यंतचा सर्व खर्च शासन करत आहे. हातकणंगले तालुक्यात यासाठी २,१४,०६७ गोल्डन कार्ड चे उदिष्ट तालुका आरोग्य विभागाला देण्यात आले होते. १००% काम पूर्ण झाले असून ४ लाख गोल्डन कार्डचे वाटप केले असल्याची माहिती हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. दातार यांनी दिली.

जिल्ह्यातील ४० मोठे खासगी दवाखाने यामध्ये उपचार उपलब्ध आहेत. हातकणंगले तालुक्यात उर्वरित दीड लाख गोल्डन कार्डचे वाटप येत्या महिन्यात करणार असल्याचेही डॉ. दातार यांनी सांगितले. तसेच हातकणंगले तालुक्यासाठी चालू वर्षी तालुक्याच्या ६१ गावात २,११,७५३ चे उदिष्ट दिले आहे. यासाठी केवायसी ऑनलाईन फॉरमॅट पूर्ण झाले आहे. हातकणंगले तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि सेविका, आशा कर्मचाऱ्यांनी वेळेत काम केले आहे.

या संधर्भात शासनाच्या वतीने या योजनेत सहभागी प्रत्येक दवाखान्यात आरोग्य मित्र याची ही नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णांना या संदर्भात संबंधित दवाखान्यात उपचार घेण्या संदर्भात आरोग्य मित्र याच्याशी संपर्क साधावा. गोल्डन कार्ड संदर्भात अडचण असल्यास नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आशा कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा .असे आवाहन हातकणंगले पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने केले आहे.