राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लोकसभा निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. अनेक सभांमध्ये अजित पवारांना आपल्या कार्यकर्त्यांना दम देताना पहिले आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लागेल तेवढा निधी देऊ पण बटन दाबायला कमी पडू नका, अस आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.

जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. मला काम करायला आवडतात. मला आदेश द्यायची सवय झाली आहे त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते, असे देखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, जो उमेदवार दिला आहे तिथल्या आमदार किंवा होऊ घातलेला आमदार असतो त्याला इच्छा असते खासदारांने ढवळाढवळ करू नये. मी 40 वर्ष झाली उमेदवाराला ओळखतो. 40 वर्षांपासून मी ओळखतो ते ढवळाढवळ करणार नाहीत ते बाहेरचे वाटणार नाही ते तुम्हाला आपले वाटतील.

पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25- 50 वर्षाचा विचार करुन काम करा. माझ्या बारामतीत सुद्धा 382 कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस काढेल कामाचा आढावा घेईल. आम्ही जो उमेदवार दिला आहे तो देखील काम करेल, असेही अजित पवार म्हणाले.