कोल्हापूर : यंदाही शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाच्या इंटरनॅशनल अफेअर्स सेल मार्फत दिवाळी उत्सवचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमस्थळी आर्कषक रांगोळी, विविध ठिकाणी आकाश कंदील लावून सजावट करण्यात आलेली होती. सुरूवातीस परदेशी विद्यार्थ्यांकडून तसेच कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मनोगतामध्ये भारतीय संस्कृतीतील दिवाळी सणाचे औचित्य, महत्त्व रूंढी-परंपरा व पध्दती सांगून परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातील आवश्यक सोयी-सुविधा बाबत बरोबरच परदेशी विद्यार्थ्यांच्या गरजाबाबत पुरविण्यात येणाऱ्या पुढील सुविधाची माहिती दिली.

आरोग्य केद्रातील डॉ. व्ही. ए. रानंडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सण-आरोग्य तसेच शैक्षणिक वर्षामधील तसेच परीक्षा काळातील आवश्यक आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी तसेच आरोग्य केद्रामधील उपलब्ध सुविधाची माहिती दिली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी उपस्थित सर्व परदेशी विद्यार्थ्यांना मिठाई देऊन दिवाळी सणाच्या व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्ऱ्यक्रमामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य, संशोधक, मार्गदर्शक, संबंधित अधिविभागप्रमुख, संलग्नित महाविद्यालयातील समन्वयक, इंटरनॅशनल हॉस्टेलचे रेक्टर डॉ. जे. बी. यादव व सर्व प्रवेशित परदेशी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक डॉ. एस. बी. सादळे यांनी केले.