सातारा – सध्या राज्यात लोकसभा पडघम वाजत आहे. अशातच महायुतीचा सातारा जागावाटपाचा तिढा काही अद्याप कायम होता अशातच सातारा लोकसभा निवडणुकी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीकडून सातारा लोकसभेचा उमेदवाराची घोषणा झालेली आहे. तो उमेदवार दुसरा तिसरा कोणतेही नसून उदयनसिंह राजे हे आहेत. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव आहे. त्यामुळे अखेर उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे असं म्हणावं लागेल. उदयनराजे यांच्यासमोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे आव्हान असणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळणार आहे.

उदयनराजें यांनी घेतली अमित शाह यांची भेट..?

साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांची भेट घेतली होती. या भेटीसाठी उदयनराजेंना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली . उदयनराजे दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरु केला होता. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादांमुळे उदयनराजेंची उमेदवारी लटकली होती . त्यामुळे पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे एकप्रकारची धाकधूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.

या जागेवरून महायुतीत वाद

सातारा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाल्लेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवार हे साताराच्या जागेसाठी आग्रही होते. त्यामुळे महायुतीत सातारा जागेवरून वाद सुरू होता. या जागेवर अजित पावर यांच्या गटाने दावा केला होता. त्यामुळे ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार अशी चर्चा सुरू होती. उदयनराजे यांनी साताऱ्यातून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. पण, उदयनराजे यांना घड्याळ नाही तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची होती. भाजपमधून उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे आग्रही होते. या साठी त्यांनी दिल्लीला देखील वारी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.