दिंडनेली प्रतिनिधी : पुढच्या येणाऱ्या पिढीला रासायनिक खतांचा वारसा देणे अयोग्य आहे. १०० टक्के सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कीटकनाशक मुक्त भाजीपाला पिकविण्यासाठी सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे. जिवामृत शेतीला प्राधान्य दयायला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे  कृषी विभागाच्या जि.प. व पं. स. करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता सिध्दिविनायक सांस्कृतिक हॉल येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. मिशन वात्सल्य अंतर्गत कोरोनामुळे निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीस बी-बियाणे वाटप करण्यात आले.

कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील विक्रमी सोयाबीन उत्पादक शेतकरी व १oo टक्के सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कारली उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार फळझाडांची रोपे देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास दऱ्याचे वडगाव वडवाडीचे सरपंच अनिल मुळीक, बसवराज बिराजदार (विभागीय कृषी सहसंचालक), प्राचार्य उमेश पाटील (कोल्हापूर), डॉ. अशोकुमार पिसाळ (विस्तार कृषी विद्यावेत्ता), करवीर पं. स.चे गटविकास अधिकारी जयवंत उगले, भीमाशंकर पाटील, जालिंदर पांगिरे, तानाजी पाटील, दीपक देशमुख, युवराज पाटील, सुनील रुपनर, टी. बी. पाटील, गौरी जंगम, जाधव, धनवडे, राठोड, शिंदे, ठोंबरे या कृषी अधिकारी यांच्यासह उपसरपंच सुनीता चव्हाण, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष नानासो बेनके, पूजा माळी (पोलीस पाटील वडगाव), सुजाता लांडे (तलाठी वडगाव), संदीप खाडे (पोलीस पाटील वड्डवाडी), हनुमान विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक, बचत गटाच्या महिला, शेतकरी उपस्थित होते.