मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर ट्विट करून   भारताशी तुलना केली आहे. त्यानंतर ‘#ArrestSwaraBhasker’ ट्विटरवर ट्रेंड होत आहे. तसेच तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली  आहे.

स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी ठीक असू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे. आपण तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही आणि मग हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल राग येऊ शकतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये दडपलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत.

या ट्विटनंतर सोशल मीडियावर स्वरावर संताप व्यक्त केला जात आहे. एका युजर्सने स्वरा भास्करला अटक करा, तिने आमच्या भावना दुखावल्या आहेत, असे म्हटले आहे. तर स्वरा भास्करला हिंदुत्वाचा अपमान केल्याबद्दल अटक करा. हिंदूंनी कधीही कोणतेही दहशतवादी कृत्य केले नाही, असा संताप दुसऱ्या युजर्सने व्यक्त केला आहे.