मुंबई (प्रतिनिधी) : सगळ्यांच्या काळजाचा ठोका बनलेली गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमीनं डान्सर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली. मात्र, अनेकांनी तिच्या डान्समुळे तिच्यावर टीका देखील केली. आता गौतमी पाटील आणि सनी लिओनी या दोघी ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या आगामी चित्रपटातील गाण्यात दिसणार आहे. गौतमीला नेहमी आपण सगळ्यांनी पारंपारिक वेशभूषेत दिसायची. मात्र, आता गौतमीचा या गाण्यातील लूक समोर आला आहे.

‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटाची निर्मिती संजीवकुमार राठोड यांनी केली आहे. यामध्ये एका हिंदी गाण्यावर गौतमी डान्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या गाण्यात गौतमी ही डान्सबार गर्लच्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट देशात आणि जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

या चित्रपटात मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी, नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशील राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर शांताबाई या फेमस गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. तसेच हरियाणाची डान्सर सपना चौधरी पहिल्यांदा मराठमोळ्या रूपात दिसणार आहे.