हैद्राबाद : नवनीत राणा यांचा हैद्राबादच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचार सभेत बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवनीत राणा या ओवैसींविषयी बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा यांनी ’15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, छोट्याला (अकबरुद्दीन ओवेसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवेसी) ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही, असे म्हणत राणा यांनी ओवेसींना एकप्रकारे आव्हान दिलं आहे. तर यावर असदुद्दीन ओवैसी यांनी कुठे यायचे ते सांग, आम्ही येऊ असं म्हणत राणांचं आव्हान स्वीकारलं आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा ?
’15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, छोट्याला (अकबरुद्दीन ओवेसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवेसी) ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही, असे विधान अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले होते.या संदर्भातला नवनीत राणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. राणांच्या या विधानावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ’15 सेकंद नाही तर एक तास घ्या. आम्ही तयार आहोत, आम्हीही घाबरत नाही. कुठे यायचे ते सांग, आम्ही येऊ, असे आव्हानच ओवैसींनी नवनीत राणांना दिले आहे.

नवनीत राणा यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीने ओवैसींनी त्यांना थेट आव्हानच दिले आहे. “मी पंतप्रधान मोदींना 15 सेकंदांचा वेळ देण्यास सांगतोय. 15 सेकंद नाही तर एक तास घ्या. पंतप्रधानांना हा अधिकार आहे. आम्ही तयार आहोत, आम्हीही घाबरत नाही. कुठे यायचे ते सांग, आम्ही तिकडे येऊ, असे आव्हान ओवसींनी नवणीत राणांना दिले. तसेच तुझ्यात किती माणुसकी उरली आहे. हे देखील आम्हाला पाहायची आहे, असे ओवेसी म्हणाले.

नवणीत राणांवर कारवाईची मागणी
नवणीत राणांवर आता एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. नवनीत राणा यांचे वक्तव्य अमरावतीच्या निवडणुकीत पराभव होत असल्याचे सूचित करते. त्यामुळे तिलाच धक्का बसला आहे. म्हणूनच ती हे सर्व सांगत आहे. पण पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडून कारवाई का केली जात नाही? कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वारीस पठाण यांनी केली आहे. तसेच ते (भाजप) ध्रुवीकरण, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील वारीस पठाण यांनी लावला.