कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई द्यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोरोना आजाराच्या महामारीतच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आहे. त्याला भरीव आर्थिक मदतीची गरज आहे. यामुळे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत करावी.

निदर्शनात शिवाजी भोसले, निलेश सुतार, विकी जाधव, उमेश जाधव, अभिजीत कांजर आदी सहभागी झाले होते.