राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणूच्या संसर्गाने अनेकजण बाधित झाले आहेत, त्यामुळे तिथे काही भागात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. २२ डिसेंबरच्या रात्रीपासून ब्रिटनमधून येणारे एकही विमान भारतात उतरू शकणार नाही. तसेच ब्रिटनला जाऊ शकणार नाही. तर… Continue reading राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी : मुख्यमंत्री

राज्य सरकारचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची जुनी निवृत्ती वेतन योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे. या योजनेला अडथळा ठरणारी १० जुलै २०२० ची अधिसूचना मागे घेतली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी… Continue reading राज्य सरकारचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

पणजी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे पाच वेळा खासदार राहिलेले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे मोहन रावले यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. आज (शनिवार) सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रावले हे मुंबईतील परळ-लालबाग भागातील अत्यंत लोकप्रिय नेते होते. १९९१ ते २००९ या काळात दक्षिण-मध्य… Continue reading शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे याला अहमदनगर न्यायालयाचा दणका

अहमदनगर (प्रतिनिधी) : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर न्यायालयाने फेटाळला आहे. बोठे याने ७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज (बुधवार) सुनावणी झाली. ३० नोव्हेंबर रोजी पुणे-नगर रस्त्यावर जतेगाव घाटात जरे यांची हत्या करण्यात आली होती.… Continue reading रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे याला अहमदनगर न्यायालयाचा दणका

मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्य पद्धतीनेच केला पाहिजे ! : फडणवीसांनी खडसावले

मुंबई (प्रतिनिधी) : अर्णव गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज (मंगळवार) अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर ते बोलत होते. या वेळी त्यांनी… Continue reading मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्य पद्धतीनेच केला पाहिजे ! : फडणवीसांनी खडसावले

राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतींसाठी जानेवारीत मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुदत संपलेल्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील ४३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पण आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने प्रलंबित निवडणुका घेतल्या जात… Continue reading राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतींसाठी जानेवारीत मतदान

राज्यातील शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज दुपारी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खा. सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. यानंतर टोपे यांनी ही घोषणा केली. टोपे म्हणाले… Continue reading राज्यातील शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आगामी अधिवेशनात मांडले जाणार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठीचे विधेयक

पुणे (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र २०२०च्या प्रारूप विधेयकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२०-२१च्या अर्थसंकल्पात क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाईल. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा… Continue reading आगामी अधिवेशनात मांडले जाणार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठीचे विधेयक

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल : पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन संसदेमध्ये अशा अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खासदारांची क्षमता वाढेल आणि त्यांच्या कार्यशैलीमध्ये  आधुनिकता येईल. सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्यानंतर दिशा दाखवण्याचं काम केलं. तर नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या हस्ते आज (गुरुवार) दिल्लीमध्ये नवीन संसद भवनच्या भूमिपूजनाचा… Continue reading नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल : पंतप्रधान

राज्य सरकारकडून मराठा समाजाची थट्टा : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची टीका भाजपचे जिल्हा (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज (बुधवार) केली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या याचिकेवर आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली. घटनापीठाने आरक्षणावरील… Continue reading राज्य सरकारकडून मराठा समाजाची थट्टा : समरजितसिंह घाटगे

error: Content is protected !!