अंबाबाई मंदिरातील सनईचे सूर झाले पोरके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या विविध धार्मिक विधींच्या कार्यक्रमांवेळी सनईच्या मंजूळ सुरांनी भक्तिमय वातावरण निर्माण करणारे सनई वादक चंद्रकांत आकाराम पोवार (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मंदिर परिसरातील सनईचे सूर आता पोरके झाले. ते तामजाई कॉलनी, गंगाई लॉन बोंद्रेनगर येथे वास्तव्यास होते. अंबाबाई मंदिरात तिन्ही त्रिकाळ चंद्रकांत पोवार… Continue reading अंबाबाई मंदिरातील सनईचे सूर झाले पोरके

शिक्षक बँक संचालक अर्जुन पाटील यांचे हातकणंगलेत स्वागत

टोप (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकपदी तासगाव, ता. हातकणंगले येथील अर्जुन दिनकर पाटील यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाली आहे. शिक्षक बँकेच्या हातकणंगले शाखेत शानदार स्वागत करून अर्जुन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अर्जुन पाटील यांनी आपल्या समर्थक शिक्षक सभासदांच्या व निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक आघाडीमध्ये… Continue reading शिक्षक बँक संचालक अर्जुन पाटील यांचे हातकणंगलेत स्वागत

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७०.९ मिमी पावसाची नोंद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज (बुधवार) चोवीस तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमी.मध्ये पुढीलप्रमाणे… हातकणंगले- ७.७ मिमी,, शिरोळ- ५.८, पन्हाळा- १८.५ , शाहूवाडी- २४.१, राधानगरी -३२.७, करवीर- २३.४, कागल- १७.२ , गडहिंग्लज- ९.३, भुदरगड- २८.९,  आजरा- १८.५  आणि  चंदगड- २४.१  मिमी पावसाची… Continue reading गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७०.९ मिमी पावसाची नोंद…

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ही’ बंधने…

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणपती उत्सवाला  जाणाऱ्यांसाठी खास काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबाबत एसटी महामंडळाने तयारी केली आहे. कोकणात प्रवास करताना प्रवाशांना मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवासापूर्वी सर्व बसेसचे निर्जंतूकीकरण केले जाणार आहे. यंदा गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत.… Continue reading गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘ही’ बंधने…

कोल्हापुरी ठसका : ‘गोकुळ’वर उड्या का पडतात ?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच ‘गोकुळ’ च्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. गोकुळ म्हणजे जिल्ह्याची डेअरी असली तरी तिची ठळक ओळख म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची मुख्य वाहिनी. ‘गोकुळ’ च्या स्थापनेपूर्वी ती एक शासकीय डेअरी होती. लालफितीचा कारभार आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे ती फारशी चालत नव्हती. वसंत-बहार चित्रमंदिराच्या परिसरात ही डेअरी होती. अपेक्षेप्रमाणे डबघाईला… Continue reading कोल्हापुरी ठसका : ‘गोकुळ’वर उड्या का पडतात ?

लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्समध्ये भीषण स्फोट : चौघांचा होरपळून मृत्यू…

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्स या कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बाळासाहेब रामचंद्र गाढवे (रा. खेर्डी, ता. चिपळूण), महेश महादेव कासार (रा. बीड), राजेश मराठकर (रा. औरंगाबाद), आशिष गोगावले (रा. चिपळूण) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार आज (शनिवार) सकाळी घडला. या स्फोटात अन्य ३ कामगार जखमी… Continue reading लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्समध्ये भीषण स्फोट : चौघांचा होरपळून मृत्यू…

मनसेने कार्यालये फोडल्यावर अ‍ॅमेझॉन नरमले… : मागितली राज ठाकरेंची माफी

मुंबई (प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे आमचे नेते राज ठाकरेंची माफीही मागितली असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी… Continue reading मनसेने कार्यालये फोडल्यावर अ‍ॅमेझॉन नरमले… : मागितली राज ठाकरेंची माफी

मंत्रिमंडळ बैठकीतील वादावादी जनहितासाठी की स्वहितासाठी ? : देवेंद्र फडणवीस

पुणे (प्रतिनिधी) : मंत्रिमंडळ बैठकीत झालेली वादावादी जनहितासाठी की स्वहितासाठी होती, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध लक्ष्मी-नृसिंह मंदिरात आज (गुरुवार) सायंकाळी पूजा करून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मंदिराच्या… Continue reading मंत्रिमंडळ बैठकीतील वादावादी जनहितासाठी की स्वहितासाठी ? : देवेंद्र फडणवीस

हे सरकार सर्वसामान्यांचं की दारूवाल्यांचं..?

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारने राज्यातील रेस्टॉरंट आणि बारमालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केला आहे. परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत असले, तरी यावरूनच भाजप नेत्या चित्र वाघ यांनी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. लॉकडाऊनच्या वीजबिलामध्ये सवलत द्या, अशी मागणी करीत सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरला. मात्र, सरकारने… Continue reading हे सरकार सर्वसामान्यांचं की दारूवाल्यांचं..?

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेचे घुमजाव…

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणात विनाशकारी प्रकल्प नको, अशी भूमिका घेत शिवसेनेने स्थानिक जनतेसह जैतापूर अणु उर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. आता सत्तेत आल्यावर मात्र शिवसेनेची भूमिका बदलली आहे. स्थानिकांना ९० टक्के मोबदला मिळाल्यामुळे जैतापूर प्रकल्प व्हावा, असे मत शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मांडले आहे. त्याचप्रमाणे नाणार प्रकल्पालाही असलेला स्थानिकांचा विरोध… Continue reading जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेचे घुमजाव…

error: Content is protected !!