महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे मयुरी थोरात हिची निवड

पंढरपूर प्रतिनिधी येथील नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमीचे मयुरी शंकर थोरात हिचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षाच्या संघात निवड झाली पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासात महाराष्ट्राच्या संघात आज पर्यंत कोणीही खेळला नाही ही खंत चौदा वर्षाच्या मयुरीने पूर्ण केली आहे ही निश्चितच पंढरपूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे. पुढे येथे झालेल्या आंतरजिल्हा सामन्यात मयुरीने 165 धावा केल्या… Continue reading महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे मयुरी थोरात हिची निवड

जगावर अधिराज्य गाजवणारे फुटबॉलचे जादूगार पेले यांचे निधन

ब्राझील : जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शतकातील महान  फुटबॉलपटू  तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांचे  निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला. पेले यांना कोलन कँसर झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, फुटबॉलचे मैदान गाजवणारा हा खेळाडू कँन्सरविरोधातील झुंज हरला. गुरुवारी २९ डिसेंबर रोजी… Continue reading जगावर अधिराज्य गाजवणारे फुटबॉलचे जादूगार पेले यांचे निधन

शिवाजी विद्यापीठाला फेन्सिंग स्पर्धेत रनरअप चॅम्पियनशिप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जम्मू विद्यापीठ जम्मू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फेन्सिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाला  रनरअप चॅम्पियनशिप मिळाली. पुरुष संघातील खेळाडू धनंजय जाधव, आदित्य अनगळ, गिरीश जकाते, प्रथम कुमार शिंदे, विपुल येडेकर, अथर्व करणाळे, श्रेयस तांबवेकर, प्रणव रावळ, साहिल  गुजर, ओम जवनजाळ, श्रीधर पवार हे होते. महिला संघाने फॉइल फाईल क्रीडा प्रकारात कास्यपदक… Continue reading शिवाजी विद्यापीठाला फेन्सिंग स्पर्धेत रनरअप चॅम्पियनशिप

शिवाजी विद्यापीठाला तलवारबाजी स्पर्धेत रौप्य

कोल्हापूर : जम्मू विद्यापीठ येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाने सेबर प्रकारात रौप्यपदक पटकावले. पदकविजेत्या तलवारबाजी संघामध्ये धनंजय जाधव, आदित्य अंगल, साहिल गुर्जर, ओम जनजाल यांचा समावेश आहे. तसेच संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून कॅप्टन डॉ. राहुल मगदूम, प्रफुल्ल धुमाळ काम पाहत आहेत.

रग्बी स्पर्धेत पणोरेच्या परितकर महाविद्यालयास विजेतेपद

कळे (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय रग्बी (पुरुष) चॅम्पियन्स स्पर्धेत अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात पन्हाळा तालुक्यातील श्री लहू बाळा परितकर महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. प्रतिस्पर्धी सातारा येथील लाल बहाददूर शास्त्री कॉलेजच्या संघास ३-२ अशा फरकाने हरवून परितकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघामधील यश अनिल लंबे, कार्तिक सर्जेराव पाटील, सुहास संभाजी पाटील, सौरभ अनिल पाटील,… Continue reading रग्बी स्पर्धेत पणोरेच्या परितकर महाविद्यालयास विजेतेपद

आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाची हॅट्ट्रिक

जबलपूर :  येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात शिवाजी विद्यापीठाने महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर संघाचा ५ गोलने पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक केली.  सामन्याच्या सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठ संघाने खेळावर ताबा ठेवला. १२ व्या मिनिटाला सिध्देश साळोखेने मोठ्या ‘डी’ बाहेरून मारलेला फटका संघाला १ गोलची आघाडी मिळवून गेला. त्यानंतर आक्रमणाची धार कायम… Continue reading आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाची हॅट्ट्रिक

नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला शहरातील आरक्षण क्रमांक ४६ बगीच्या येथे  देवा स्पोर्ट्स आणि फाईट क्लब आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे  उद्घाटन माजी नगरसेवक आनंदा माने यांचे शुभहस्ते संपन्न झाले.  तसेच यावेळी आरक्षण क्रमांक ४६ बगीचा या ठिकाणी वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक आनंदा माने, माजी नगरसेवक माऊली तेली, गणेश निंबाळकर, काशिलिंग गावडे, आनंदा गावडे,… Continue reading नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न

थायलंडच्या जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुचे खेळाडू सध्या जगभरात आपला डंका वाजवत आहेत. नुकतीच ओशनमॅन आशियाई चॅम्पियनशिप २०२२ जलतरण स्पर्धा थायलंड येथे पार पडली. यामध्ये जगभरातून २५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये भारतातील १२  तर महाराष्ट्रातील ६ स्पर्धकांचा समावेश होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंनी पदक आपल्या नावे करत कोल्हापूरचे नाव पुन्हा उंचावले आहे.… Continue reading थायलंडच्या जलतरण स्पर्धेत कोल्हापूरकर  

फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी महामुकाबला

कतार (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन संघांमध्ये रविवारी अटीतटीची लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव केला. आता या दोघांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होत आहे.  अंतिम सामन्यापूर्वी लिओनेल मेस्सी फिट नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप… Continue reading फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी महामुकाबला

क्रिकेट : पुण्याच्या युनायटेड क्लबचा सांगलीवर विजय

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील युनायटेड स्पोर्ट्स क्लब पुणे व सांगली क्रिकेट असोसिएशन या संघा दरम्यान झालेला दुसरा सामना पुण्याच्या युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने जिंकला. युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना ७२.१ षटकात सर्वबाद १८२ धावा केल्या. उत्तरादाखल सांगली जिल्हा संघाने ६८.३… Continue reading क्रिकेट : पुण्याच्या युनायटेड क्लबचा सांगलीवर विजय

error: Content is protected !!