कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुचे खेळाडू सध्या जगभरात आपला डंका वाजवत आहेत. नुकतीच ओशनमॅन आशियाई चॅम्पियनशिप २०२२ जलतरण स्पर्धा थायलंड येथे पार पडली. यामध्ये जगभरातून २५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये भारतातील १२  तर महाराष्ट्रातील ६ स्पर्धकांचा समावेश होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या दोन खेळाडूंनी पदक आपल्या नावे करत कोल्हापूरचे नाव पुन्हा उंचावले आहे.

या जलतरण स्पर्धांमध्ये ९ वर्षांखालील गटात ओशन कीड१  किमी पोहणे या प्रकारात श्लोक पांडव याने सुवर्ण पदक पटकावले. तर १४ ते १९  वर्ष गटात हाफ ओशनमॅन ५  किमी पोहणे प्रकारात यशवर्धन मोहिते याने कास्य पदकाची कमाई केली आहे. यामुळे या दोघांची पुढील वर्षी होणाऱ्या ओशनमन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे. नुकतेच ते दोघेही स्वगृही परतले आहेत. दोघे परत आल्यानंतर कोल्हापुरात त्यांचे जल्लोषी स्वागत स्वागत करण्यात आले.