कोल्हापूर (प्रतिनिधी) : जम्मू विद्यापीठ जम्मू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फेन्सिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाला  रनरअप चॅम्पियनशिप मिळाली.

पुरुष संघातील खेळाडू धनंजय जाधव, आदित्य अनगळ, गिरीश जकाते, प्रथम कुमार शिंदे, विपुल येडेकर, अथर्व करणाळे, श्रेयस तांबवेकर, प्रणव रावळ, साहिल  गुजर, ओम जवनजाळ, श्रीधर पवार हे होते. महिला संघाने फॉइल फाईल क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकावले. महिला संघातील विजेते खेळाडू ज्योती सुतार, अनन्या जोशी,  तनवी कुराडे, अमृता तराळ, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक डॉ. राहुल मगदूम, प्रफुल धुमाळ.