ओडिशा येथे शुक्रवारपासून विश्वचषक हॉकी स्पर्धा

ओडिशा (वृत्तसंस्था) : येथे १३ जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे. भारतासह १६ संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १६ संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून, ४४ सामने होणार आहे. हॉकी विश्वचषकात भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत सिंह याच्याकडे आहे. हॉकी विश्वचषक सलग दुसऱ्यांदा भारतामध्ये होत आहे.… Continue reading ओडिशा येथे शुक्रवारपासून विश्वचषक हॉकी स्पर्धा

विराट-हार्दिकमध्ये बिनसलं?

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली अनेकांसाठी आदर्श आहे. भारतीय संघामध्ये नव्याने येणाऱ्या खेळाडूंसाठी सुद्धा त्याच्यासोबत खेळणे म्हणजे पर्वणी. हार्दिक पांड्यापासून ते के. एल. राहुलपर्यंतच्या सर्वच खेळाडूंसाठी विराट म्हणजे आदर, प्रेम; परंतु आता मात्र व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये विराट आणि खऱ्या अर्थाने त्याच्या प्रभावात असणारा हार्दिक पांड्या या… Continue reading विराट-हार्दिकमध्ये बिनसलं?

श्री माताजी निर्मलादेवी शाळेत क्रीडा सप्ताहाचे उदघाटन

पंढरपूर प्रतीनिधी सौ. सुनेत्राताई पवार यांच्या कुशल नेतृत्वात “समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षण” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत क्रीडा सप्ताहाचे उदघाटन पंढरपुरातील प्रसिद्ध कर सल्लागार श्री विश्वंभर पाटील  यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत प्र. मुख्याध्यापक श्री संतोष कवडे यांनी केले.… Continue reading श्री माताजी निर्मलादेवी शाळेत क्रीडा सप्ताहाचे उदघाटन

महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स्‌ : फुटबॉलमध्ये कोल्हापूरला अजिंक्यपद 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स्‌मधील फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने पुणे संघाला ३-२ गोलफरकाने हरवून  विजेतेपद पटकाविले. ही अजिंक्यपद स्पर्धा  बालेवाडी, पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर, परभणी, सांगली व नागपूर अशा आठ संघांचा समावेश होता. कोल्हापूर संघांने परभणी संघांस ६-० गोलफरकाने पराभव करून उपांत्य… Continue reading महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स्‌ : फुटबॉलमध्ये कोल्हापूरला अजिंक्यपद 

जाधव कुटुंबीय फुटबॉल संघांच्या पाठीशी खंबीर : ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची नाळ फुटबॉलशी जोडलेली होती. त्यांच्या अकाली निधनानंतरही याची प्रचिती येत आहे. अण्णांसाठी फुटबॉलचे संघ व खेळाडू कुटुंबप्रमाणे होते. खेळाडूंना त्यांचा मोठा आधार होता. जाधव कुटुंबीय फुटबॉल संघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. कोल्हापूरमधील सोळा वरिष्ठ फुटबॉल संघातील खेळाडूंना जाधव इंडस्ट्रीजतर्फे (गोकुळ… Continue reading जाधव कुटुंबीय फुटबॉल संघांच्या पाठीशी खंबीर : ऋतुराज पाटील

भारत-श्रीलंका वनडे मालिका मंगळवारपासून

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. मंगळवार, दि. १० जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून, टी-२० मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने ही एकदिवसीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.  बऱ्याच कालावधीनंतर दुखापतीमुळे… Continue reading भारत-श्रीलंका वनडे मालिका मंगळवारपासून

सिख गेम्समध्ये कोल्हापूरच्या समीक्षाचे यश…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्ली येथे झालेल्या सिख गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये लाठी स्पोर्ट्स प्रकारात महाराष्ट्राकडून खेळताना कोल्हापूरच्या सिझलर्स अकॅडमीच्या समीक्षा सचिन डावरेने २ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावले. तिला सचिव धनश्री इंगळे, प्रशिक्षक ऋतुराज इंगळे, संभाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

छत्रपती शाहूंचा वारसा सांगणारी मल्लविद्या फुलण्याची गरज – शाहू महाराज छत्रपती

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथील खासबाग मैदान येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. खासदार शरद पवार यांच्या हस्ते समस्त कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्यावतीने सन्मान करण्यात आला. हे मैदान मोतिबाग तालमीचा मल्ल शिखंदर शेख याने मारले. या कार्यक्रमावेळी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा असणारी… Continue reading छत्रपती शाहूंचा वारसा सांगणारी मल्लविद्या फुलण्याची गरज – शाहू महाराज छत्रपती

चटकदार लढतींसाठी ‘खासबाग’ सज्ज; संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आढावा

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन देखील केले असून या लढती खासबाग मैदान कोल्हापूर येथे पार पडणार आहेत. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित असणार आहेत. आज ७ जानेवारी रोजी होणाऱ्या लढतींच्या पार्श्वभूमीवर ‘स्वराज्य’ संघटनेचे… Continue reading चटकदार लढतींसाठी ‘खासबाग’ सज्ज; संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आढावा

श्री विठ्ठल प्रशालेत पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेचा समरोप 

पंढरपूर/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर तालुका क्रीडा अधिकारी पंढरपूर व विठ्ठल प्रशाला व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वेणूनगर, गुरसाळे ता पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने  पुणे विभागीय  मुला मुलींची कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेचे उद्घाटन खासदार रणजीतसिंह नाईकनिंबाळकर  अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण पाटील होते. या स्पर्धेचा समारोप, प्रशाला कमिटीचे अध्यक्ष… Continue reading श्री विठ्ठल प्रशालेत पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेचा समरोप 

error: Content is protected !!