पंढरपूर प्रतिनिधी येथील नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमीचे मयुरी शंकर थोरात हिचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षाच्या संघात निवड झाली पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासात महाराष्ट्राच्या संघात आज पर्यंत कोणीही खेळला नाही ही खंत चौदा वर्षाच्या मयुरीने पूर्ण केली आहे ही निश्चितच पंढरपूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.

पुढे येथे झालेल्या आंतरजिल्हा सामन्यात मयुरीने 165 धावा केल्या आणि उत्कृष्ट विकेट कीपिंग केल्यामुळे तिला महाराष्ट्र संघात स्थान मिळाले तिला क्रीडा शिक्षक नागेश साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले तिचे रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या
क्रीडा प्रशिक्षक नागेश साळुंखे यांनी ज्या गोष्टीची गेली अकरा वर्ष आतुरतेने वाट पाहतोय. स्वतःचे स्वप्न मयुरी मध्ये बघत असताना माझे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली पंढरपुरातून महाराष्ट्राच्या संघात निवड झालेली मयुरी ही पहिलीच मुलगी आहे