ब्राझील : जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शतकातील महान  फुटबॉलपटू  तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांचे  निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला. पेले यांना कोलन कँसर झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, फुटबॉलचे मैदान गाजवणारा हा खेळाडू कँन्सरविरोधातील झुंज हरला. गुरुवारी २९ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

२०व्या शतकातील महान फुटबॉलपटू पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी आणि हृदय फेल झाले होते. त्यामुळे त्यांची दिवसे न् दिवस प्रकृती खालावत चालली होती. पेले यांना डॉक्टरांच्या खास पथकाच्या निगरानी खाली ठेवण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.