कोल्हापूर (प्रतिनिधी) राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे २५ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या २५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत कु. जिजाऊ जीवन पाटील (रा. आसगांव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) ही वैयक्तिक फॅाईल प्रकारात सुवर्ण पदक आणि टीम फॅाईलमध्ये ब्रॅाझ पदक पटकावले. जिजाऊ पाटील हिचे वय ११असून तिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे.

जिजाऊ पाटीलने उपांत्यपूर्व लढतीत बिहारची राज केसरला १५:६ असे हरविले आणि अंतिम सामन्यात चंदीगढच्या चामोली रूबीला १५:९ ने जिंकून महाराष्ट्राचे नाव सुवर्ण पदावर कोरले. तसेचजानेवारीमध्ये झालेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत ही रौप्य पदक जिंकले होते. तिने आता पर्यंत ४ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ६ राष्ट्रीय पदकांना गवसणी घातली आहे. तसेच २०२२ रोजी थायलॅंड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. फेन्सिंग खेळ प्रकारात सर्वात्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

कुमारी जिजाऊ पाटील ही अक्षरनंदन पुणे या मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी आहे. एन गार्ड फेन्सिंग ॲकॅडमी बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचा खेळातील सर्वाच्च शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालीया, मणिपूरचे बोमाय, तामिळनाडूचे शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करते.

तिला भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे. या यशामध्ये तिला तिचे आजोबा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी. डी. पाटील (आसगांवकर), वडील जीवन पाटील, आई मनीषा पाटील तसेच पाटील कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.