साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साताऱ्यामध्ये आज (रविवार) वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये एक अघिटत घटना घडली आहे. या स्पर्धेत एका कोल्हापूरच्या धावपटूचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कांतीलाल पटेल (वय ३०, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. साताऱ्यामध्ये आज वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूरचा धावपटू… Continue reading साताऱ्यात कोल्हापूरच्या धावपटूचा स्पर्धेत मृत्यू…

कळे येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे रास्ता रोको…

कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने पन्हाळा, गगनबावडा सेविका व मदतनीस यांच्यावतीने विविध मागण्यासाठी कळे येथे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दस्तुरी चौक परिसरात रास्ता रोको करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ती कळे पोलिसांनी सुरळीत केली. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीसांना वेतन लागू करा, महागाई… Continue reading कळे येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे रास्ता रोको…

कागलमध्ये आ. मुश्रीफ यांच्या हस्ते दीडशे नागरीकांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप…

कागल (प्रतिनिधी) : कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दीडशे नागरीकांना मंजुरी पत्राच्या वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. आ. मुश्रीफ म्हणाले, १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली. त्यावेळी दरमहा अवघे दोनशे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून… Continue reading कागलमध्ये आ. मुश्रीफ यांच्या हस्ते दीडशे नागरीकांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप…

कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोल्हापूरच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून… Continue reading कोल्हापुरात मोदींच्या वाढदिनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद

‘त्या’ मुलींचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले पालकत्व

मुंबई (प्रतिनिधी) : उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील  यांचा काम करीत असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार, या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या आणि त्या मुलींच्या मदतीला आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे देवासारखे धावून गेले. ‘त्या’ मुलींचे संपूर्ण पालकत्व घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर… Continue reading ‘त्या’ मुलींचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वीकारले पालकत्व

शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.… Continue reading शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (शनिवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भरत गावित यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. माणिकराव गावित यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल… Continue reading माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

नागपूर (वृत्तसंस्था) : दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या दरम्यान,… Continue reading संघाच्या दसरा सोहळ्यात महिला गिर्यारोहक प्रमुख पाहुण्या

सात दशकानंतर आठ चित्ते भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त… Continue reading सात दशकानंतर आठ चित्ते भारतात दाखल

जिल्हा परिषदमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी… Continue reading जिल्हा परिषदमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ

error: Content is protected !!