वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी राज्यभर राष्ट्रवादीची निदर्शने

मुंबई/ पुणे (प्रतिनिधी) : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याचा विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘५० खोके, महाराष्ट्राला धोके’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी आरोप केला की,… Continue reading वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी राज्यभर राष्ट्रवादीची निदर्शने

लाल बावटातर्फे योजना संदर्भात जनजागृती मोहीम : कॉ. सुतार

राशिवडे (प्रतिनिधी) : इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळातून मिळणाऱ्या योजना समजण्यासाठी लाल बावटातर्फे जनजागृती मोहीम सुरु केली असून, या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. संदीप सुतार यांनी केले आहे. ते म्हणाले, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना सक्रिय असून, या संघटनेच्या माध्यमातून गावोगावी कामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांना नवीन… Continue reading लाल बावटातर्फे योजना संदर्भात जनजागृती मोहीम : कॉ. सुतार

योजना कोणीही राबवल्या तरी त्यावर शिक्का माझाच : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : बिळात लपलेले विरोधक सत्ता संघर्षानंतर बाहेर पडलेत. त्यांना माझे विधायक काम पटले आहे.  त्यामुळेच मी सुरू केलेल्या योजना ते राबवित आहेत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांच्या कल्याणाच्या या योजना कोणीही राबवीत असले, तरी त्यावर शिक्का मात्र माझाच आहे, असेही ते म्हणाले. तालुक्यातील कसबा सांगाव येथे बांधकाम  कामगारांना सुरक्षा साहित्य… Continue reading योजना कोणीही राबवल्या तरी त्यावर शिक्का माझाच : मुश्रीफ

‘घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसले यांना निलंबित करा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील घरफाळा घोटाळयास जबाबदार असलेले माजी कर निर्धारक व अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आज कोल्हापूर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळा करून महापालिकेचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. भोसले यांच्या विरोधात आजवर अनेक वेळा आंदोलने झाली. अनेक तक्रारी देखील झाल्या आहेत. तरी… Continue reading ‘घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसले यांना निलंबित करा’

जैन सेवासंघातर्फे महावीर अध्यासनास १.११ लाखाची देणगी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रास जैनसेवा संघातर्फे भगवान महावीर अध्यासनास १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी देण्यात आली. भगवान महावीर अध्यासनासाठी १३ कोटी रुपये खर्चून भव्य वास्तू उभारली जाणार आहे. यातून जैनधर्माचे शास्त्रीय संशोधन व युवकांना मार्गदर्शन यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कार्य केले जाणार आहे. या कार्यासाठी जैनसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी… Continue reading जैन सेवासंघातर्फे महावीर अध्यासनास १.११ लाखाची देणगी

रेशनधान्य बंदचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

कुंभोज (प्रतिनिधी)  : हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष, कुंभोज ग्रा.पं. सदस्य अजित देवमोरे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना रेशनधान्य बंद करण्याचे परिपत्रक रद्द करावे, या मागणीचे निवेदन दिले आहे. पिवळे व केशरी रेशनकार्डचा लाभ घेणारे सरकारी कर्मचारी, करदाते, खासगी नोकरदार, घरात चारचाकी वाहन व तत्सम सुविधा असणारे, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी कुटुंबे शोधून त्यांना पांढऱ्या… Continue reading रेशनधान्य बंदचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

सत्यमेव जयते संघटनेच्या सचिवपदी जी. एस. कांबळे

कोतोली (प्रतिनिधी) : मुंबई येथील सत्यमेव जयते संघटनेच्या महाराष्ट्र सचिवपदी गगनबावडा तालुक्यातील जी. एस. कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कांबळे यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष डॉ. अफजल देवळेकर यांनी दिले आहे. मुंबई येथे अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर पदाधिकारी आहेत. प्रदेश सचिवपदी निवड झालेले जी. एस. कांबळे हे… Continue reading सत्यमेव जयते संघटनेच्या सचिवपदी जी. एस. कांबळे

हणमंत साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपला : उत्तम कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हणमंत साठे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची व रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आ) मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले… Continue reading हणमंत साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपला : उत्तम कांबळे

गोकुळतर्फे लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोफत लसीकरण : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत सदैव सोबत आहे. लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोकुळमार्फत मोफत लसीकरण सुरु आहे. संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले असल्याचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले. तसेच दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी, एलएसएस आणि कृत्रिम रेतन सेवकांच्यामार्फत मोफत लसीकरणाचे नियोजन केले… Continue reading गोकुळतर्फे लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोफत लसीकरण : विश्‍वास पाटील

कुरुंदवाडमधील विकासासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शहराच्या विकासासाठी कोल्हापूर विभागाचे नगररचना सहायक संचालक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात बैठक झाली. बैठकीत उपलब्ध जमीन वापर आराखडा, दाटीवाटीची जागा, महापुरामुळे येणार्‍या अडचणी, बांधकाम परवानाबाबत येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कुरुंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहर विकास आराखड्याची माहिती सभागृहाला दिली. चर्चेत प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षित जागांमुळे नागरिकांना… Continue reading कुरुंदवाडमधील विकासासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा

error: Content is protected !!