कोल्हापूर (प्रतिनिधी) : साताऱ्यामध्ये आज (रविवार) वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये एक अघिटत घटना घडली आहे. या स्पर्धेत एका कोल्हापूरच्या धावपटूचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कांतीलाल पटेल (वय ३०, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

साताऱ्यामध्ये आज वर्षा मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूरचा धावपटू राज पटेल याने भाग घेतला होता. यावेळी स्पर्धा सुरु असताना राजला ह्द्यविकाराचा तिव्र झटका येऊन तो मृत्यूमुखी पडला. या तरुण धावपटूचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.