कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोल्हापूरच्या वतीने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या सेवा पंधरवडा अभियानास सुरवात करण्यात आली. खा. धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्रदेश सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी मंदिर, अहिल्यादेवी होळकर विद्यालय याठिकाणी रक्तदान शिबिराचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरातील ७ मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आजच्या रक्तदान शिबिरासाठी महापालिकेची रक्तपेढी, अर्पण रक्तपेढीचे डॉक्टर आणि सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंडल स्तरावर दि. २ ऑक्टोबरपर्यंत विविध सेवाभावी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

दि. ८ रोजी पाटील मंगल कार्यालय, टेंबलाईवाडी याठिकाणी सकाळी १० ते ५ यावेळेत भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले असून,येथे मोफत हृदयरोग चिकित्सा व निदान, आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड काढणे, बांधकाम कामगार नोंदणी व रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे. आण्णासो शिंदे विद्यालय, लक्षतीर्थ वसाहत येथे सकाळी १० ते ०२ यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. आजच्या कार्यक्रमावेळी राजू मोरे, प्रदीप पंडे, गिरीष साळोखे, हर्षवर्धन पाटील, विजय आगरवाल, पारस पलीचा, दिग्विजय कालेकर, गोविंद पांडिया, सुधीर देसाई, विजय दरवान, रोहित कारंडे, विवेक वोरा, सचिन आवळे, प्रताप देसाई, संग्राम जरग, अशोक लोहार, राजेंद्र वडगांवकर, सौरभ मालंडकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डिकर, स्वाती कदम पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.