नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिल्याचे आज (शनिवार) स्पष्ट केले. आयकर भरण्यासाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती. . प्राप्तीकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (त्यांच्या भागीदारांसह) आयकर विवरणपत्र देण्याची तारीख ३१ ऑक्टोबरऐवजी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आयकर भरण्यासाठी कालावधीत केंद्र सरकारकडून तब्बल चार वेळा वाढवण्यात आला आहे. यापूर्वी ३१ मार्चवरून ३० जून करण्यात आला होता. त्यानंतर ३१ जुलै आणि नंतर ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला