मुंबई (प्रतिनिधी) उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आणखी एका आमदाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण या आमदाराची आज तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. राजन साळवी हे आज सकाळी ११.३० वाजता चौकशीसाठी यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.

नगरसेवकपदापासून ते आमदार होईपर्यंतची कारकीर्द आणि संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न तसेच मालमत्तेबाबतची सविस्तर माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे राजन साळवी यांनी सांगितले. एसीबीने तक्रारदाराचे नाव सांगितले नाही, मात्र लोटे-परशुराम येथील सनी नलावडे याने तक्रार केल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला आहे.