जळगावमध्ये गणपतराव पाटील-खडसे यांच्यात कुरघोडी

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खड्सेंचा पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला. त्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात. शरद पवारांनी तुम्हाला दिलेली एमएलसी पण वापस घेतली पाहिजे. एकनाथ खडसे यांची ताकद कमी करण्यामध्ये त्यांचा स्वतःचा हात आहे. जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंबरोबर नाही. जिल्हा दूध संघाच्या… Continue reading जळगावमध्ये गणपतराव पाटील-खडसे यांच्यात कुरघोडी

मुख्यमंत्री बोम्मई माज आल्यासारखे बोलतात : उद्धव ठाकरे

ठाणे (प्रतिनिधी) : कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखे बोलत आहेत. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटलेला असताना महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाही आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला. दिवसेंदिवस महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळत आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज उद्धव… Continue reading मुख्यमंत्री बोम्मई माज आल्यासारखे बोलतात : उद्धव ठाकरे

हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदरसिंग सुक्खू

शिमला (वृत्तसंस्था) : सुखविंदर सिंग सुक्खू यांनी रविवारी दुपारी १.५० वाजता हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असलेल्या प्रतिभासिंह यांना प्रियांका गांधी यांनी आपल्या शेजारी बसवले. सुक्खू यांनी मंचावरून काँग्रेसच्या सर्व आमदारांसह समर्थकांना अभिवादन केले. रिज मैदानावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी… Continue reading हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदरसिंग सुक्खू

चंद्रकांतदादांवर शाईफेक हे राजकीय षडयंत्रच : खा. महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. जाणूनबुजून आणि कटकारस्थान रचून ही शाईफेक करण्यात आली आहे. त्या मागचे खरे सूत्रधार लवकरच समोर येतील, असा दावा खासदार महाडिक यांनी केला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानाचा सोयीस्कर विपर्यास अर्थ काढून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही… Continue reading चंद्रकांतदादांवर शाईफेक हे राजकीय षडयंत्रच : खा. महाडिक

सुषमा अंधारे यांचा सरकारी समिती सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. अंधारे यांनी पाटील यांनाच पत्र पाठवून याबाबत कळवले आहे. त्यामुळे आता या सगळ्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, याकडे… Continue reading सुषमा अंधारे यांचा सरकारी समिती सदस्यत्वाचा राजीनामा

सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे म्हणून सरकारमधील नेते अशी बेताल वक्तव्य करत आहेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मविआच्या काळात एकही प्रकल्प गेला नाही, आताच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. खमकेपणाणे राज्यासाठी काम केले तर राज्याचा विकास होतो, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले… Continue reading सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे : अजित पवार

सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट : रामदास आठवले

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आधी माझ्या पक्षात होत्या तसेच अंधारे या टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.  ‘सुषमा अंधारे या टीका करण्यात एक्सपर्ट आहेत, टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये’ अंधारे आमच्याही पक्षात होत्या; पण… Continue reading सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट : रामदास आठवले

पंतप्रधानांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे : उद्धव ठाकरे

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे. तुम्ही आमचे पालक आहात. पालक असल्यासारखे बोला, अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारी सुरु झाले. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची… Continue reading पंतप्रधानांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे : उद्धव ठाकरे

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळातील दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, असे सांगितले जात होते; परंतु तो मंत्रिमंडळ विस्तार आता रखडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःकडची अतिरिक्त खातीसुद्धा इतर मंत्र्यांकडे सोपवली आहेत. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १८ कॅबिनेट मंत्री पकडून जवळपास २० मंत्री आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा… Continue reading राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला

‘या’ सर्व महात्म्यांबद्दल माझ्या मनात आदर : ना. चंद्रकांत पाटील

औरंगाबाद (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांनी देशात आणि महाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात शाळा सुरु केल्या. यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा आहे, त्याबद्दल कुणी शंका उपस्थित करण्याचे कारणच नाही, अशी स्पष्टोक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ते औरंगाबाद इथे बोलत होते.… Continue reading ‘या’ सर्व महात्म्यांबद्दल माझ्या मनात आदर : ना. चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!