राजू शेट्टी पुन्हा रूग्णालयात दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल झाले आहेत. रक्तदाब वाढल्याने ते उपचारासाठी दाखल झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. गेले दोन दिवस ते दिल्लीत शेतकरी प्रश्नासाठीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ते पुण्यात आले. नेहमीच्या… Continue reading राजू शेट्टी पुन्हा रूग्णालयात दाखल

‘हा’ त्याच एका कटकारस्थानाचा भाग : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : आपण सर्व भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा समजते की काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते आणि आताही द्यायचे नाही. सुनावणीदरम्यान वकील उपस्थित नसणे, हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे. परंतु जनता सुजाण आहे, ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.… Continue reading ‘हा’ त्याच एका कटकारस्थानाचा भाग : चंद्रकांत पाटील

मुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा  

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो. आता  लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता लवकरच आम्ही मराठी तुला थोबडवनार, अशी धमकी मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला दिली आहे. बिग बॉसच्या १४ व्या पर्वात जान कुमार सानूने मराठी… Continue reading मुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा  

शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा : जिल्हाप्रमुखांना आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. यंदा कोरोनाच्या… Continue reading शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा : जिल्हाप्रमुखांना आदेश

आरएसएसच्या नेत्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपाताचा डाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने इसिस या दहशतवादी संघटनेच्या कटाची माहिती उघड केली आहे. कोरोना जिहादच्या नावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना टार्गेट करणे आणि त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपात करण्याचा आयएसआयएसचा डाव होता. ही खळबळजनक माहिती एनआयएने स्थानिक कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. इस्लामिक स्टेट खोरासन प्रांतच्या अटक केलेल्या पाच… Continue reading आरएसएसच्या नेत्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपाताचा डाव

हेलिकॉप्टरमुळे आघाडीने माझे तिकीट कापले : सुजय विखेंचा गौप्यस्फोट

मुंबई (प्रतिनिधी) : अहमदनगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून तिकीट नाकारण्यासंबंधी एक गौप्यस्फोट केला आहे.  हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझे लोकसभेला तिकीट कापले,  असा दावा सुजय विखे यांनी नगरमध्ये सभेत बोलताना केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याअगोदर शरद पवार यांनी तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील, तर निवडून कसा येणार?… Continue reading हेलिकॉप्टरमुळे आघाडीने माझे तिकीट कापले : सुजय विखेंचा गौप्यस्फोट

शरद पवार साहेब हॅट्‌स ऑफ…! ; पंकजा मुंडेंचे ट्विट  

मुंबई (प्रतिनिधी) : शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, अशा शब्दांत  भाजप नेत्या व माजी मंत्री  पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाबद्दल ट्विट… Continue reading शरद पवार साहेब हॅट्‌स ऑफ…! ; पंकजा मुंडेंचे ट्विट  

शिवसेना खासदाराची हत्या करण्यासाठी २ कोटींची सुपारी

परभणी (प्रतिनिधी) : आपली हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला २ कोटींची सुपारी देण्यात आली असल्याची तक्रार परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे परभणीमध्ये खळबळ उडाली आहे. परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीने ही सुपारी देण्यात आली असल्याचे जाधव यांनी  आपल्या तक्रारीत म्हटले आहे. जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु… Continue reading शिवसेना खासदाराची हत्या करण्यासाठी २ कोटींची सुपारी

मुख्यमंत्र्यांचं भाषण ‘शिमग्या’तलं वाटत होतं ! : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. त्यांना ही भाषा शोभत नाही. केवळ भाजपवर टीका करण्यासाठी भाषणाला उभा राहिले होते असं वाटत होतं. बेताल टीका कराल तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देत त्यांचे भाषण हे दसरा मेळाव्यातील… Continue reading मुख्यमंत्र्यांचं भाषण ‘शिमग्या’तलं वाटत होतं ! : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर राष्ट्रवादी उत्तर विधानसभेच्या अध्यक्षपदी आदित्य चव्हाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आदित्य चव्हाण यांची कोल्हापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या निवडीचे पत्र चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी आदित्य चव्हाण यांनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. तर या निवडीसाठी आर. के. पोवार, महेंद्र चव्हाण, प्रसाद… Continue reading कोल्हापूर राष्ट्रवादी उत्तर विधानसभेच्या अध्यक्षपदी आदित्य चव्हाण…

error: Content is protected !!