परभणी (प्रतिनिधी) : आपली हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला २ कोटींची सुपारी देण्यात आली असल्याची तक्रार परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे परभणीमध्ये खळबळ उडाली आहे.

परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीने ही सुपारी देण्यात आली असल्याचे जाधव यांनी  आपल्या तक्रारीत म्हटले आहे. जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून संपूर्ण माहिती घेतल्यानंरच गुन्हा दाखल केला जाणार आहे. खासदार जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.