कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल झाले आहेत. रक्तदाब वाढल्याने ते उपचारासाठी दाखल झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

गेले दोन दिवस ते दिल्लीत शेतकरी प्रश्नासाठीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ते पुण्यात आले. नेहमीच्या तपासणीसाठी ते सायंकाळी रूग्णालयात जाणार होते. पण त्यांचा रक्तदाब वाढला. दम लागत असल्याने ते डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, या आधीही प्रकृती बिघडल्याने राजू शेट्टी रूग्णालयात दाखल झाले होते.