मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.

दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. यंदा कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी जिल्हाप्रमुखांना दिले.

कोरोनाच्या काळात सरकार आपले काम करतं आहे, पण पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केल्या. टीकाकारांना टीका करु द्या, तुम्ही तुमचे काम करत राहा असा सल्लाही त्यांनी दिला.