कोल्हापूर (प्रतिनिधी) : आदित्य चव्हाण यांची कोल्हापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या निवडीचे पत्र चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी आदित्य चव्हाण यांनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. तर या निवडीसाठी आर. के. पोवार, महेंद्र चव्हाण, प्रसाद उगवेसो यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले.