नेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गच्या काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी राज्य शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वत्र मोहीम राबविण्यात आलेली आहे. त्याच पध्दतीने महानगरपालिकेचे आरोग्य विभागकडील कर्मचारी काम करत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 59 च्या नगरसेविका सौ. अश्विनी बारामते यांच्यामार्फत नेहरू नगर प्रभागामधील आरोग्य सेवक, झाडू कामगार व प्रभागातील प्रत्येक घरात सॅनिटीझर बाटली स्कचे… Continue reading नेहरूनगर प्रभागात सॅनिटायझर, मास्कचे वाटप : सौ. अश्विनी बारामते

आयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी 5 लाखांचा जनरेटर देण्याचे जाहिर केले. न्यू पॅलेस इथे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजीव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी… Continue reading आयसोलेशन हॉस्पिटलला जनरेटर देणार : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

सोमवारी गारगोटी इथे मराठा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे रास्तारोको

गारगोटी (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास स्थगिती दिल्यानंतर समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. भुदरगड तालुक्यातील गावागावातून आंदोलन होत आहे. त्यातच राज्य शासन नोकरभरती करत असून ती थांबवावी या मागणीसाठी तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने (दि.२८) सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गारगोटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षण बचाव संघर्ष… Continue reading सोमवारी गारगोटी इथे मराठा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे रास्तारोको

कळेमध्ये आई, दोन मुलांच्या पाठोपाठ वडिलांचाही सहाव्या दिवशी मृत्यू

कळे (प्रतिनिधी) : कळे येथील प्रसिद्ध व्यावसायिक कुटूंबातील दि. १९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आई आणि दोन मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. नतंर याच कुटूंबातील वडिलांचा आज (गुरुवार) सहाव्या दिवशी कोरोनाच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यासह जिल्हा हादरला होता. याच… Continue reading कळेमध्ये आई, दोन मुलांच्या पाठोपाठ वडिलांचाही सहाव्या दिवशी मृत्यू

शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर हॉटस्पॉट बनण्याच्या वाटेवर

सावरवाडी (प्रतिनिधी) : ग्रामस्थाचा बेफीकीरपणा, समूह संसर्गाचा वाढता धोका, अकार्यक्षम ग्रामपंचायतीचे प्रशासन, ग्राम कोरोना दक्षता समितीचे थंडावलेले कार्य, कडक लॉकडाऊन राबविण्यात झालेले दुर्लक्ष या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर,ही गावे आता कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. समुह संसंर्गाचा धोका वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. आज अखेर शिरोली दुमाला ४, गणेशवाडी ४, बहिरेश्वर… Continue reading शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर हॉटस्पॉट बनण्याच्या वाटेवर

टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून टोप गाव हे हातकणंगले गावातील हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनानकडून गार्भियाने लक्ष देऊन सर्व्हे तसेच इतर उपायोजना केल्या जात आहेत. यातच महाराष्ट्र शासनाचा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व्हे सुरु असताना गावात आज (गुरुवार) शाखा अभियंता हातकणंगले ए. एस. शेळखे यांनी टोप गावास अचानक… Continue reading टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

हिटलरच्या काळातही असेच कायदे झाले होते

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी १५० वर्ष जे झटले त्या सर्वांच्या परिश्रमाचे आता मातीमोल झाले आहे. सध्या अँटी पीपल लॉज म्हणजे जनविरोधी कायदे करण्याचा काळ सुरु आहे. जर्मनीतही हिटलरच्या काळात असेच फटाफट कायदे झाले होते. त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहे, असा आरोप राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश… Continue reading हिटलरच्या काळातही असेच कायदे झाले होते

चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रविण मल्लीकार्जून वाटंगी

चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करण्यात आली. चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते  प्रविण मल्लीकार्जून वाटंगी यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात झाली. या व्यतिरिक्त अमरोळीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव दत्तू मंडलिक-पाटील, मागासवर्गीय सदस्य कृष्णा यल्लापा कांबळे, इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून सलीम कासीम मोमीन व गुंडू… Continue reading चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रविण मल्लीकार्जून वाटंगी

गणेश देवी यांनी घेतली शेट्टी यांची भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, फळ बागायत शेतकरी, कामगार यांना एकत्रित करून दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करण्यासाठी राष्ट्र सेवा दलचे अध्यक्ष भाषातज्ञ गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची शिरोळ निवासस्थानी भेट घेतली. महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशामध्ये मजबूत चळवळ उभी केली. याचदिवसाचे औचित्य साधून… Continue reading गणेश देवी यांनी घेतली शेट्टी यांची भेट

शेतकऱ्यांना वेळेवर डिव्हिडंड मिळण्यासाठी मंजूरीचे अधिकार सहकारी संस्थांना द्या :आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या सभा झाल्या नसल्याने डिव्हिडंड आणि रिबेट रकमेला मंजुरी देताना तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याचा विचार करून यंदा ही मंजुरी देण्याचे अधिकार त्या त्या संस्थेच्या संचालक मंडळाला द्यावेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सभासदांना वेळेवर ही रक्कम मिळावी, यासाठी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी… Continue reading शेतकऱ्यांना वेळेवर डिव्हिडंड मिळण्यासाठी मंजूरीचे अधिकार सहकारी संस्थांना द्या :आ.ऋतुराज पाटील

error: Content is protected !!