इलेक्ट्रिकल मोटरी, दुचाकी, सोलर साहित्य चोरट्यांच्या मुसक्या इस्पुर्ली पोलिसांनी आवळल्या..!

( दिंडनेर्ली प्रतिनिधी कुमार मेटील ) गेल्या अनेक दिवसांपासून इस्पुर्लीसह पंचक्रोशीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतातील इलेक्ट्रिकल मोटरी, सोलर साहित्य, जून्या दुचाकी गायब करणे सुरु केले आहे. या संदर्भात स्थानिक नागरीकांनी आपले साहित्य गायब होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी यंत्रणा वेगवान केली असता या चोऱ्यांमध्ये सामिल असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात इस्पुर्ली पोलिसांना… Continue reading इलेक्ट्रिकल मोटरी, दुचाकी, सोलर साहित्य चोरट्यांच्या मुसक्या इस्पुर्ली पोलिसांनी आवळल्या..!

एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांवर परदेशात बंदी…

मुंबई (प्रतिनिधी) : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांचा भारतात अनेक वर्षांपासून घरांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, याच मसाल्यांवर आता परदेशात बंदी घालण्यात आली आहे. सिंगापूर, हाँगकाँगबरोबरच नेपाळमध्येही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी टाकली आहे. तर नेपाळमध्ये भारताच्या एव्हरेस्ट, एमडीएच मसाल्यांच्या विक्री आणि आयातीवर बंदी घालण्यात आली आहे नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागानं या… Continue reading एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांवर परदेशात बंदी…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना पी.एच.डी. जाहीर..!

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिकी विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या प्रा. माने यांनी “अॅनालेसीस अँड ऑप्टिमाइझेशन ऑफ टर्निंग प्रोसेस पॅरामीटर्स फॉर इंकोनेल ७१८ कॉपर ओक्ससाईड बेस्ड नॅनोलुब्रिकेशन विथ मिनिमम क्वांटीटी लुब्रिकेशन” या विषयावर शोधनिबंध सादर… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना पी.एच.डी. जाहीर..!

कोल्हापुरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई 60 हजारांचे साहित्य जप्त

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण… Continue reading कोल्हापुरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई 60 हजारांचे साहित्य जप्त

देश घडवणारा अभियंता व्हा : डॉ.विनयरावजी कोरे

वारणानगर (प्रतिनिधी ) : तुमची व आई वडिलांची स्वप्ने घेऊन तूम्ही वारणेत आला, उत्कृष्ट अभियंते म्हणुन स्वतः ला सिध्द केले, आपल्या विषयात प्राविण्य मिळवले पण देश घडवणारा अभियंता बनण्याचा प्रयत्न करा असा सल्ला श्री वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. निमित्त होते तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस)… Continue reading देश घडवणारा अभियंता व्हा : डॉ.विनयरावजी कोरे

महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मींनी दिली रंकाळा सुशोभीकरण कार्यस्थळी भेट

कोल्हापूर : रंकाळा तलाव इथं सुरु असलेल्या या कामाची बुधवारी दुपारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अचानक कार्यस्थळी  जाऊन तपासणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी ठेकेदारामार्फत पुर्ण क्षमतेने कामे सुरु नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कामावर ठेकेदाराचे कोणीही कामगार उपस्थित नव्हते. याठिकाणी कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी नाराजी व्यक्त करुन ही कामे दिलेल्या मुदतीत पुर्ण करण्याच्या सूचना… Continue reading महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मींनी दिली रंकाळा सुशोभीकरण कार्यस्थळी भेट

भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. सुनील छेत्रीने आज १६ मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय… Continue reading भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

‘या’साठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्सून काळात पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती, अचानक पडणाऱ्या वीजा आणि इतर आपत्तींचे व्यवस्थापन… Continue reading ‘या’साठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी

निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

पुणे : महाराष्ट्र चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. अजून पाचव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्या आधी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाविकस आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लागले होते. यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदान… Continue reading निकालाआधीच पुण्यात मविआ उमेदवारांच्या विजयाचे झळकले बॅनर

डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी ‘जी पॅट’ एक्झामबाबत मार्गदर्शनपर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. प्राचार्य डॉ. सी एम जंगमे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत ‘जी पॅट’ प्रशिक्षक आणि करिअर मार्गदर्शक, फार्मस्टार अकेडमी नांदेडचे संचालक डॉ विजयकुमार चकोते यांनी यावेळी परीक्षेतील यशाचे मंत्र विद्यार्थ्यांना… Continue reading डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन

error: Content is protected !!