कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गच्या काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी राज्य शासनाने माझं कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वत्र मोहीम राबविण्यात आलेली आहे. त्याच पध्दतीने महानगरपालिकेचे आरोग्य विभागकडील कर्मचारी काम करत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 59 च्या नगरसेविका सौ. अश्विनी बारामते यांच्यामार्फत नेहरू नगर प्रभागामधील आरोग्य सेवक, झाडू कामगार व प्रभागातील प्रत्येक घरात सॅनिटीझर बाटली स्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी मेडिकल ऑफिसर अर्पिता खैरमोडे, प्रभागातील कोविडचे सचिव राजू यादव, प्रभागातील कोविडच्या परिचारिका शुभांगी सुतार, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, मुकादम दिलीप सुतके, अरुण बारामते, करण बारामते, शिवाजी जवंदाळ, अमित कांबळे यांचे सहकार्य लाभले.