सावरवाडी (प्रतिनिधी) : ग्रामस्थाचा बेफीकीरपणा, समूह संसर्गाचा वाढता धोका, अकार्यक्षम ग्रामपंचायतीचे प्रशासन, ग्राम कोरोना दक्षता समितीचे थंडावलेले कार्य, कडक लॉकडाऊन राबविण्यात झालेले दुर्लक्ष या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर,ही गावे आता कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत.

समुह संसंर्गाचा धोका वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. आज अखेर शिरोली दुमाला ४, गणेशवाडी ४, बहिरेश्वर २ रुग्णांचा  कोरोनाने मृत्यू झाला आहे.