रामचंद्र मूग यांच्याकडून आता फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून मिळणार सेवा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्वाहर्ता आणि पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर गेल्या १०० वर्षांपासून कोल्हापूरच्या मातीत रुजलेल्या मे. रामचंद्र तवनाप्पा मूग या किराणामाल दुकानाने आपल्या व्यवसायात एक खास ब्रॅण्डच नावारूपाला आणला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी व्यवस्थापनाने विविध ठिकाणी फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून आपला किराणा माल देण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिन्यापूर्वी रंकाळा येथे पहिल्या फ्रॅंचाईजीची मुहूर्तमेढ… Continue reading रामचंद्र मूग यांच्याकडून आता फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून मिळणार सेवा

शेतकरी आंदोलनाचे पडसाद बाजार समितीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील उमटत आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर त्याचा परिणाम झाला. कांदा उलाढाल व्यवहार बंद राहिली. त्यामुळे दिवसभर बाजार समितीच्या आवारात वर्दळ… Continue reading शेतकरी आंदोलनाचे पडसाद बाजार समितीत

‘स्वयंप्रभा मंच’ने महिलांचा आत्मविश्वास वाढवला : अनुराधा भोसले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात महिलांना सकारात्मक कामात गुंतवून निकोप स्पर्धा घेत त्यांच्यात आत्मविश्वास कायम ठेवण्याचे काम ‘स्वयंप्रभा मंच’ने केले आहे, असे गौरवोद्गार अवनी आणि एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधाताई भोसले यांनी काढले. लॉकडाऊनच्या काळात विविध ऑनलाईन आणि काही प्रत्यक्ष स्पर्धा ‘स्वयंप्रभा मंच’ ने घेतल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील स्मृती भवन… Continue reading ‘स्वयंप्रभा मंच’ने महिलांचा आत्मविश्वास वाढवला : अनुराधा भोसले

दौलत कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्याने ‘ताम्रपर्णी’तील शेकडो मासे मृत्युमुखी

चंदगड (प्रतिनिधी) : दौलत (अथर्व) कारखान्यातील मळी मिश्रित पाणी ताम्रपर्णी नदीत मिसळून येथील जल जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यामध्ये तांबुळवाडी, बसर्गे, माणगाव गावानजीक शेकडो मासे मरून पडले असून या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटल्याने स्थानिक हैराण झाले आहेत. त्यामुळे दौलत (अथर्व) साखर कारखाना प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी… Continue reading दौलत कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्याने ‘ताम्रपर्णी’तील शेकडो मासे मृत्युमुखी

…अन्यथा आत्मदहन करू : जयराज कोळी (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बापट कँम्प येथील कत्तलखान्याचे बेजबाबदार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी आज (सोमवार) येथे दिला.  कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बापट कँम्प येथील कत्तलखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या भोंगळ कारभाराविरोधात आजपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेसमोर आमरण… Continue reading …अन्यथा आत्मदहन करू : जयराज कोळी (व्हिडिओ)

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महाविकास आघाडी की सोयीचे राजकारण..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित ठेवण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. टप्याटप्याने गोकुळ, केडीसीसी, इतर काही साखर कारखान्यांसह छोट्या-मोठ्या संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षात घडामोडींना सुरुवात झाली आहे. यामुळे सहकारी संस्थांमध्ये पदवीधर, शिक्षक मतदारसंघाप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून की सोयीचे राजकारण रंगणार याबद्दल प्रचंड… Continue reading जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महाविकास आघाडी की सोयीचे राजकारण..?

बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहिणीशी चॅटींग केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. प्रशांत सदाशिव पाटील (वय २०, रा. बोलोली, ता करवीर) असे जखमीचे नाव असून त्याने याप्रकरणी खाटांगळे (ता. करवीर) येथील चौघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोलोली येथील प्रशांत पाटील याने एका मुलीशी चॅटिंग केले होते.… Continue reading बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण

कृषी कायदे देशामध्ये त्वरित लागू करा : प्रा. एन. डी. चौगुले (व्हिडिओ)

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे देशामध्ये त्वरित लागू करावेत, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगुले यांनी केली.  

‘गोकुळश्री’ स्पर्धेत वंदना जरळी यांची म्‍हैस, तर किरण चौगले यांच्या गायीचा प्रथम क्रमांक

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते. सन २०२०-२१ साठी ७ नोव्हेंबर रोजी घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये ७८ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादक सभासदांनी भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. यामध्ये गडहिंग्लज येथील लक्ष्‍मी विकास सेवा संस्थेच्या सभासद सौ. वंदना… Continue reading ‘गोकुळश्री’ स्पर्धेत वंदना जरळी यांची म्‍हैस, तर किरण चौगले यांच्या गायीचा प्रथम क्रमांक

‘पिक्चर अभी बाकी है’ ! : अरुण डोंगळे (व्हिडिओ)

‘गोकुळ’चा ‘पिक्चर अभी बाकी है’ असे मत संचालक अरुण डोंगळे यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केले.  

error: Content is protected !!