कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहिणीशी चॅटींग केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. प्रशांत सदाशिव पाटील (वय २०, रा. बोलोली, ता करवीर) असे जखमीचे नाव असून त्याने याप्रकरणी खाटांगळे (ता. करवीर) येथील चौघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोलोली येथील प्रशांत पाटील याने एका मुलीशी चॅटिंग केले होते. प्रशांत याने चॅटिंग केल्याचा राग मनात ठेवून खाटांगळे येथील मुलीच्या भावाने पासार्डे येथील धरणाजवळ प्रशांत पाटील याला बोलवून घेतले. त्यानंतर मुलीच्या भावासह चौघांनी प्रशांत पाटील याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या महाराणीत प्रशांत गंभीर जखमी झाला. याप्रकरणी त्यांने जयदीप कृष्णात पाटील, कृष्णात पाटील, सचिन दिनकर आरडे आणि ऋषिकेश पाटील या चौघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.