राज्यात रात्रीची संचारबंदी, लॉकडाऊन करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) :  नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावेळी रात्रीची संचारबंदी लागू होणार अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी आणि पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (रविवार) जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… Continue reading राज्यात रात्रीची संचारबंदी, लॉकडाऊन करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त यशवंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन आणि यशवंत भालकर यांच्या प्रतिमेचे पुजन बाळासाहेब कडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नटराजाच्या मुर्तीचे पुजन अभिनेते नितीन कुलकर्णी,  चित्रपट महामंडळचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, कॅमेरामन इम्तीयाज बारगीर, श्रीमती रेखा भालकर आणि संजय भालकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.… Continue reading चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ६ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १४२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २ आणि… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ६ जणांना डिस्चार्ज

अखेर मोतीबाग तालीममध्ये कुस्ती सरावास प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभरात लॉकडाऊनमुळे मागील ८ महिने बंद असणारे कुस्ती आखाडे शासनाच्या नियमानुसार आजपासून कुस्तीगिरांना सरावासाठी खुले झाले. जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली मोतीबाग तालीम आज (शनिवार) पहाटे ६ वा. श्री हनुमान मूर्तीचे आणि आखाडा पूजन करून सुरु करण्यात आली. यावेळी पैलवानांनी कुस्तीचा सराव करण्यात आला. या… Continue reading अखेर मोतीबाग तालीममध्ये कुस्ती सरावास प्रारंभ

महाडिक गटाला खिंडार : राजाराम कारखान्याच्या माजी संचालिकेच्या सुपुत्र सतेज पाटील गटात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडमुडशिंगी गावातील आणि छ. राजाराम कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील याचा मुलगा सुदर्शन यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यानी आज (शनिवार) आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगीमधील मागील अनेक वर्षे महाडिक गटाचे नेतृत्व करणारे व  छ. राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता पाटील… Continue reading महाडिक गटाला खिंडार : राजाराम कारखान्याच्या माजी संचालिकेच्या सुपुत्र सतेज पाटील गटात…

मुंबई-पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार : आ. ऋतुराज पाटील (व्हिडिओ)

आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर वाहतूक पोलिसांना लेड बॅटन प्रदान कार्यक्रम पार पडला. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार असल्याची ग्वाही यावेळी आ. पाटील यांनी दिली.  

राजर्षी शाहू महाराजांच्या लोकसेवेचे मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले. गडहिंग्लजच्या बेलबाग येथील श्री जडेयसिद्धेश्वर आश्रमात बसवेश्वर स्वामी यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.    महास्वामीजी म्हणाले की, मुश्रीफ यांचे नेतृत्व गोरगरिबांची… Continue reading राजर्षी शाहू महाराजांच्या लोकसेवेचे मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण…

राज्य सरकारचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची जुनी निवृत्ती वेतन योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे. या योजनेला अडथळा ठरणारी १० जुलै २०२० ची अधिसूचना मागे घेतली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी… Continue reading राज्य सरकारचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

विरोधकांना सहकार मोडीत काढायचाय : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक असून विरोधकांनी चांगल्या कामांना विरोध करू नये. विरोधकांना सहकार मोडीत काढून खाजगीकरण करायचे आहे, असा आरोप माजी आ. अमल महाडिक यांनी केला आहे. ते टोप (ता. हातकणंगले) येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. राजाराम सोसायटीचे चेअरमन भगवान पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी महाडिक म्हणाले की, कारखान्यास… Continue reading विरोधकांना सहकार मोडीत काढायचाय : अमल महाडिक

मामेभावाच्या खूनप्रकरणी आळते येथील तरुणास जन्मठेप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मामेभावाचा खून केल्याबद्दल आळते येथील तरुणाला न्यायालयाने जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हरीश शरद दाभाडे (वय २९, रा. साठेनगर, आळते, ता. हातकणंगले)  असे त्याचे नाव आहे. हरीश दाभाडे व सागर कांबळे हे एकमेकांचे आते-मामे भावंडे आहेत. आळते येथे ते एकमेकांच्या शेजारी ते राहात होते. सागरचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध… Continue reading मामेभावाच्या खूनप्रकरणी आळते येथील तरुणास जन्मठेप

error: Content is protected !!