कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मदर तेरेसा यांनी आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत चांगल्या आचार आणि विचारांचा प्रसार समाजासाठी केला. म्हणून साऱ्या जगाने त्यांना आदर्शस्थान मानत त्यांचा आदर केला. आपले घर आणि समाजातही हा विचार रुजवावा. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि लोक तुमचा आदर्श घेतील. असे प्रतिपादन प्रवचनकार प.पू मुनिराज जयभानु शेखर यांनी केले. ते कुरुंदवाड येथे जैन श्वेतांबर मंदीरात महापुजेवेळी बोलत होते.

यावेळी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ कुरुंदवाडचे अध्यक्ष प्रफुल्ल व्होरा यांच्या हस्ते भगवान चिंतामणी पार्श्वनाथजी आणि श्रीमूर्तींना अठरा अभिषेक घालण्यात आला. महापूर आणि कोरोणा ही आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी ही महापूजा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अन्नदान करून जनावरांच्यासाठी पशुखाद्य आणि वैरणीचे दान करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील,संतोष शहा,सचिन व्होरा प्रकाश शहा, विजय व्होरा, रितेश शहा, शैलेश व्होरा, अभिनंदन शहा, सुहास शहा, वृषभ शहा  आदी उपस्थित होते.